STORYMIRROR

Samadhan Navale

Others

3  

Samadhan Navale

Others

निसर्ग आणि मी

निसर्ग आणि मी

1 min
217

हे डोंगर,ही कडीकपारी,ही वृक्षलता सारी

 हे उंच उंच कडे सारी,ही धुंद हवा न्यारी |

वाटे ही साठवावी डोळ्यात आठवण

वाटे तो 'स्वर्ग' इथूनी, मला तो अर्थशून्य,

पक्षागत मनाला या, घ्यावी वाटे भरारी..

धुक्याचे दुर दुर साम्राज्य पसरलेले

वाटे त्या क्षितिजावरती आकाश उतरलेलं

या मुक्त हवेत मजला वाटे हे रानं न्हालं

हिरवळीने ही नटली त्यामुळेच सृष्टी सारी...

ओढे बनून वाहे.. रक्तवाहिन्या गिरिच्या

ही इवली इवली झुडपे, हा हिरवळी गालिचा

भेदभाव तो याला अक्षरही कळेना

चाहूल जातीपातीची, दुरदुर मिळेना,

पशुपक्षी,झाडे सारी,लेकूरे ह्याची प्यारी...

वेगळ्या जगात या मनसोक्त हिंडावे

बनून अंगच निसर्गाचे, मस्त बागडावे,

मैत्री करावी या मित्राशी..

आगमनाने ज्यांच्या मला नाचावसं वाटतंय

ह्या निसर्गाने माझी केली ह्रदय चोरी...

हि डोंगर कडीकपारी, ही वृक्षलता सारी |


Rate this content
Log in