STORYMIRROR

Samadhan Navale

Others

3  

Samadhan Navale

Others

स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती

1 min
220

वाटते आज मजला स्वप्न जाहले साकार

जीवनाने आज माझ्या घेतला नवा आकार ||

होते उरी बाळगलेले स्वप्न क्षणोक्षणी ज्याचे

केली धडपड आज झाले सार्थक त्या तपाचे,

ईश्वराची कृपा झाली मजवरती ही आज

चंदेरी ताऱ्याला ह्या चढला सोनेरी साज,

मनाचे हे सर्व माझ्या,दबले आज विकार

वाटते आज मजला स्वप्न जाहले साकार ||

नव्हता जरी माझा कुणी सखा पाठीराखा

झाला माझा पांडुरंग सखा पाठीराखा,

राखी सर्वांची मर्जी,मग मी का अपवाद त्याचा

ऋणी झालो आज मी,त्या काशी विश्वनाथाचा,

डगमगत्या माझ्या नावेला, दिला शिवाने आधार

वाटते आज मजला स्वप्न जाहले साकार ||

स्वप्नासाठी याच माझ्या, केले सर्वस्व अर्पण

नव्हती आशा तेच स्वप्न, होईल आज पुर्ण

ठेवली होती तयारी जाण्याची, परिस्थितीला सामोरे

त्याचेच फळ स्वप्न माझे, झाले आज साजरे,

करेना का मन माझे ? सत्याचा या स्विकार

वाटते आज मजला स्वप्न जाहले साकार ||

राहीले असते अधुरे मला दुःखात लोटून

मजपासून असते दुर, रोजरोज भेटुन,

कडू जहर अपमानाचे लागले असते प्यावे

मोल भारी स्वप्नांचे, लागले असते द्यावे,

स्वप्नपूर्तीने आज माझ्या जीवा दीला आधार

वाटते आज मजला स्वप्न जाहले साकार

जीवनाने आज माझ्या घेतला नवा आकार ||


Rate this content
Log in