STORYMIRROR

Anupama TawarRokade

Fantasy Inspirational

4  

Anupama TawarRokade

Fantasy Inspirational

कर्मवीर

कर्मवीर

1 min
443

कर्मवीरांच्या पुण्य कर्माने

गौरविली खान्देशाची माती

तिरंग्याचा मळवट भरी

गर्वाने सारे राष्ट्रगीत गाती


खान्देशाच्या पवित्र धरेवर

कर्मवीरांचा चरणस्पर्श

विश्वकर्मासम रचियता

ठरला येथे परीसस्पर्श


शिक्षणाची गंगा माथ्यावरी

घेवून ठरले भगीरथ

व्यंकटरावजी रणधीर

यांनी चालविला जन रथ


स्वच्छतेचा घेवून हो प्रण

झाले येथले गाडगेबाबा

हागणदारी मुक्त गावाची

अविरत ठेवली हो शोभा


अंधश्रद्धेच्या दलदलीत

उघडविले जनांचे डोळे

या गर्तेतेतून आदिवासी

वाचविले अनेक भोळे


श्रमदान स्वयंशिस्तीतून

स्काउट गाईडचे हे पर्व

गाजविले महाराष्ट्रातून

आम्हास सदा वाटे हो गर्व


जन संवादातून जोडली

अनेक अतुट अशी नाती

जनजागृतीतून मांडल्या

मोडल्या वाईट चालीरीती 


लोकनेते निवडून आले

राजकारणातही लढले

प्रतिबिंबीत आरशासम

लोकांच्या हक्कासाठी जगले


दरीखोऱ्यात दिसत असे

कर्मवीरांचा कर्तृत्व बाज

ऐकू येते मातीत इथल्या

खान्देशाच्या दर्याची गाज


शत् शत् करीतो नमन

स्वातंत्र्यसेनानींच्या कार्याला

ही शेकडो तोफांची सलामी

रणधीरांच्या दृढ शौर्याला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy