मोरपंखी बासरी
मोरपंखी बासरी

1 min

239
मोरपंखाच्या या सौंदर्याला
बासरी वाद्याची असे जोड
रंगांची अबोल उधळण
येथे धून बासरीची गोड
भक्तीमय चैतन्यास नित
अमुर्त प्रेमाची देते साक्ष
अलौकीक आर्त संवेदना
नव उर्जेसहीत चाणाक्ष
हिरवळीवर पहुडले
वाद्यासहीत सौंदर्य खाण
एक निल फुल उमलले
सकारात्मकता खरी जाण
मनोमिलन रंग स्वरांचे
प्रतिक प्रेमाचे शांततेचे
जीवन ही असेच सुंदर
मिलन श्रद्धेने संयमाचे
सप्तसुरांची गाठ जाहली
सप्तरंगांतील पिसाऱ्याशी
सप्तअक्षरे मी ही अर्पिते
समर्पण माझे लेखनीशी