तो अन् बाभळी
तो अन् बाभळी

1 min

141
तो राबतो शेतात
रानोमाळी एकला
तुजी साथ हो नसे
तरी नाही थकला
देखे उभी बाभळी
कोणी देखत नाही
परी सजे फुलांनी
काटा बहरलाही
कष्ट त्याचे देखीले
बांधावर रे उभी
घामाच्या धारा वाही
धरा पित सुरभी
तो देखे तिज असा
रखरखत्या उन्ही
ती उभी रे साधवी
तपस्वी भासे दोन्ही
आशेपोटी राबती
स्वप्ने उरी बांधूनी
नाही तीस अपेक्षा
उभी बांध सांधूनी