STORYMIRROR

Anupama TawarRokade

Romance Fantasy

3  

Anupama TawarRokade

Romance Fantasy

गुलाबी हास्य

गुलाबी हास्य

1 min
161

गोड गुलाबी हासणे तुझे

तुझा सुंदरसा अलंकार

तुझ्या आनंदाने फुलतसे

माझे गोजीरेसे घरदार


लावण्यात तुझ्या चपखल

बसली गालावरची खळी

लाजता खुदकन हसता

प्रेमातसे हृदय माझे बळी


सौंदर्याची खाण असे तुज

चुडा देख करी ग प्रशंसा

गुलाब डोकावे जुड्यातून

तुच माझ्या हृदयातली हंसा


विनम्रता नजरेत झळकते

तू असे ग जलद दामिनी

शब्द खुळे माझे समरस

माझ्या हृदयाची असे स्वामिनी



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance