मराठीची कौतुके
मराठीची कौतुके


माय बोलीची कौतुके
साकारीतो काव्यमय
अभिमान दावितसे
अष्टाक्षरी ज्ञानमय
बोल मराठीचे खडे
शब्दसाठा स्वयंपूर्ण
अनेकार्थी ताकदीचे
शब्द असे अर्थपूर्ण
व्याकरण वा समास
अलंकार काव्यगुण
वृत्त काळ दमदार
शब्दरूप बहुगुण
शुद्धलेखनाची तत्वे
अटी नियम सखोल
खडे बोल शिकविती
घ्यावी भाषेची दखल
अनमोल धन असे
माझी मायबोली भाषा
मराठीची ख्याती जगी
पसरावी हिच आशा
नतमस्तकसे नित
माय बोलीचे लेकरू
जाणा रे जबाबदारी
चला संवर्धन करू