अनुजा
अनुजा


काव्यरूपी परीचय देतांना
गजाननास मनोभावे स्मरते
गुंफन शब्दांरूपी फुलांची घालून
सर्व सारस्वतांना नमन करते
थाळनेरच्या तवरांची लेक मी
उंटावदच्या रोकडेंची झाले सुन
सोहम निलभची आई, *अनुपमा*
जगदिशजींच्या हृदयाची खून
लिखाण माझी आवड आहे
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका
माजी नगरसेवक निवडून आले
शिक्षण समिती सभापती मी रक्षिका
दोन पुरस्कारांनी सन्मानित आहे
सावित्रीच्या लेकी व हिरकणी भारी
दोन पुस्तके प्रकाशित आहेत
काव्य परीमळ आणि अभंगवारी
<
/p>
इंग्रजी भाषेची मी प्राध्यापिका
मराठी भाषेची आहे अभ्यासक
निरनिराळ्या काव्य प्रकारांचा
अभ्यास करून लिहिते रचनात्मक
अनेक मिळाले प्रमाणपत्र आणि
खूप मिळाल्या मला मैत्रिणी
लिखाणाने राज्यभर मिळाली ओळख
आणि मी झाले काव्य रागिणी
अजून खूप करायचेय लिखाण
स्वतःला अजून करायचेय सिद्ध
अलक लिहायच्या आहेत बऱ्याच
चारोळींचे अनुजा होईल लवकरच प्रसिद्ध
आरसा जणू समोर ठेवून
मांडलाय स्व-परीचय काव्यात
समुहात घेतलेत सामावून तसे
माझ्या कविताही स्विकाराव्यात