हिमशिखरे
हिमशिखरे

1 min

146
अंतर्मुख करणारे
हिमालयाची दरीखोरे
पांढऱ्या पाषाणातून वाहती
पाण्याचे निर्मळ झरे
हिमशाल पांघरलेले
हिमशिखरे भासती
सहनशील धेय्यवेडे
अंतर्मुख ज्ञानी दिसती
जन्मदाता नदी झऱ्यांचा
स्त्रोत प्रवित्र निर्मळतेचा
निसर्गाची अदभूत माया
चकाकती कणकण मातीचा
एकमेकांचा घट्ट पकडून
हात उभी दिमाखात
हिमनग बनून भारताचा
अप्रतिम देखणा मुकुट
सुर्य किरणांनी सोनेरी
शाल पांघरविली पहाटे
हिमालय सौंदर्य भासे
स्थित स्वर्गानुभूती वाटे