STORYMIRROR

Anupama TawarRokade

Fantasy Inspirational

3  

Anupama TawarRokade

Fantasy Inspirational

कवित्व

कवित्व

1 min
190


अनुभव दाटतात हृदयी

आठवणींचा होतो पसारा

आवरताना हे सारे

कविता येते जन्माला


भावनांची रेलचेल येथे

विचारांचा असतो थाटमाट

परीस्थितीचे अवलोकन अन् 

शब्दांचा घातला जातो घाट


अलंकारांची चंगळ होते

यमकांची चालते मस्ती

व्याकरणाशी हुज्जत घालून

नियम दावे जबरदस्ती


बारीक सारीक घटना

काटेकोरपणे रचलेले

दुर्लक्षित क्षण कटाक्षाने

चपखलपणे रेखाटलेले


साहित्याची रसाळ गोडी

दिसते भाषेवरचे प्रभुत्व

भान हरपून लिहितो कवी

आकारास येते त्याचे कवित्व


Rate this content
Log in