सदाबहार हायकू
सदाबहार हायकू
धुंद पाऊस
मोहरतो मनाला
प्रेम क्षणाला
पाऊस आला
बरसला तो भारी
धुंदल्या सरी
चिंब मी ओली
अंग ही शहारले
धुंद मी न्हाले
कृष्ण मुरारी
राधा ही बावरी
प्रेम ती सरी
टपोरे थेंब
मौक्तिक सुकुमार
धुंद चकोर
कोसळे सरी
उधाणले अंतरी
सागर तिरी
मनास भावे
पहिला तो पाऊस
मनास हौस
थेंब टपोरे
पडे ते टपटप
मनी हुरूप
मनी धुंदला
पाऊस आसुसला
मनी गंधला
मृत्तिका गंध
भुलवतो मनाला
जीव गुंतला