घमंडी बेडकी
घमंडी बेडकी


एका तळ्यात होते
पिल्लू बेडकांचे छान
टूण टूण उड्या मारी
खूप गोडूला तो सान
भारी खेळे पाण्यासंगे
करी मजा मस्ती खूप
पाण्यातच माझे जग
होते त्यास हो अप्रूप
एके दिनी काय झाले?
बैल चरतच आला
पाहुनिया तो बैलाला
मनोमन घाबरला
धापा टाकीत निघाला
आईकडे सांगण्यास
प्राणी भला मोठा दिसे
चल आई पाहण्यास
आई विचारू लागली
प्राणी कोणता दिसला?
किती मोठा होता अन्
कुठे होता तो बसला?
करी वर्णन बेडूक
नाव नाही जाणतसे
परी खूप मोठा प्राणी
घाबरून तो सांगतसे
उगाच अहं गर्व फुकाचा
बेडकी तनु फुगवसे
कुवत नाही नाही क्षमता
वरचेवरती फुगवत असे
शेवटी फुगून मेली बेडकी
जीव गेला हाकनाक
बरोबरी नको कुणाशी
बोध घ्यावा जीवनात