पणती
पणती


एक पणती
तेजाळली,
प्रकाशली
मनी बहरली
आंतरिक तेजात
अंध:कारातून
नकारात्मक
काजळी दूर करत
ध्येय दिशा दाखवत
इतरांना मार्ग दाखवत
स्वतः मात्र जळत राहिली
एक पणती
एक पणती
मिणमिणती
कितीही संकटे
येतील तरी वादळाची
तमा न बाळगता
दिशाहीन काळोखात
आशेचा किरण दाखवत
ध्येय दिशेने चालली
एक पणती