मैत्री मैत्रीचा धागा
मैत्री मैत्रीचा धागा


मैत्रीचा धागा
प्रेमाने बांधते
जन्मोजन्मीची नाती
मैत्रीतच पाहाते
मैत्रीविना आयुष्य
रुक्ष नि भकास
मैत्रीतच सामावते
धरती नि आकाश
दोन अक्षरी शब्द
व्यापकता मैत्रीत आहे
कृष्ण-सुदाम्याची मैत्री
आजन्म पवित्र आहे
नाही भेदभाव कुठे
नाही जातीचा गंध
दाही दिशा दरवळे
मैत्रीचा सुगंध
मैत्रीतच असतो
निर्मळ मनाचा भाव
मैत्रीतच वसतो
सारा प्रेमाचा गाव
दुःखाच्या वाळवंटात
मैत्री आधार देते
सुख-दुःखाच्या वाटेवर
मदतीचा हात देते
मैत्रीमध्ये नसते
रक्ताचीच नाती
मैत्री म्हणजेच असते
अनमोल प्रीती