Life
Life
1 min
20.5K
जगावे कितीही जगणे तरी जगणे कळत नाही
पानझडीचा मौसम तरी पान गळत नाही
नेहमीसाठीच जगू हा गैरसमज आहे
प्रत्येक जण काळाचा नाजूक सावज आहे
आज वाटले तरी उद्या असतोच की पुढे
तब्बेत खमकी करतात मग औषधाचे काढे
जगण्यासारखे काही नसले तरी कुणीच मरत नाही
पानझडीचा मौसम तरी पान गळत नाही
सुख पण पाहुणा बनून येते कधी जिथे
नाराजिचे मोठे इमले बांधून जाते तिथे
कोण म्हणतो आम्ही काही फिकीर करत नाही
सुखासाठी स्वप्नांची चाकरी करत नाही
प्रत्येकाला खुश करणे काम आमचे आहे
आम्हास नाराज करणे काम तुमचे आहे
कितीही आम्ही नाचलो तरी टाळी पडत नाही
पानझडीचा मौसम तरी पान गळत नाही