STORYMIRROR

Prasad Jahagirdar

Others

1  

Prasad Jahagirdar

Others

कधी कुणाला

कधी कुणाला

1 min
3.0K


कधी कुणाला हवे ते जग मिळत नाही

कधी जमीन तर कधी आकाश मिळत नाही

 पाहावे ज्याला तो आपल्यातच गुंग आहे

 शब्द आहेत पण ऐकायला कोणी मिळत नाही

  कोण विजवू शकले सांगा जखमांचे ते निखारे

 आग आहे ही अशी कि धूर तिचा उठत नाही

जगात तुझ्या असे नाही कि प्रेमच मिळत नाही

पण जिथे हवे तिथे का नाही तेच कळत नाही


Rate this content
Log in