STORYMIRROR

Sunjay Dobade

Fantasy

4  

Sunjay Dobade

Fantasy

धुकं

धुकं

1 min
29.2K


थंडीने कुडकुडणारं बर्फाळ धुकं

शुभ्र खिडकीच्या तावदानावर

टकटक करत कळवळून विणवतंय

'मलाही आत घ्या,

मिळू द्या थोडी उब'

मी अधिकच घट्ट आवळून घेतोय

माझं मऊशार उबदार ब्लँकेट

मला नाही येत त्याची दया

'माझंच दु:ख मला जड झालंय

तुला कुठे आत घेऊ?'

मी वैतागतो त्याच्या कटकटीला

ते ढिम्म हालत नाही

हट्टी भिकाऱ्यासारखं!


बंद होत जातं हळूहळू

धुक्याचं रडगाणं

मला अस्वस्थ करते

त्याची केविलवाणी शांतता

मी हळूच उघडतो खिडकी...


डोंगर गिळणारं धुकं

नसतंच कुठं आजूबाजूला

सर्वस्व व्यापून उरलेलं धुकं

लोळागोळा होऊन पडलेलं असतं

खिडकीच्या तळाशी

आणि काचेच्या तावदान उमटलेले असतात

त्याच्या अश्रूंचे ओघळ!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy