ढगांची मस्ती
ढगांची मस्ती


आकाशात ढगांची
चाललीय मस्ती
वेशभूषा बदलून
खेळात दंग असती
कुणी झाले घोडा
कुणी माकड हत्ती
कासव, ससा, मोर
एकमेकास देता बत्ती
ड्रॅगन मध्ये डोकावे
अवाढव्य भासतसे
नाग फणा काढून
उभा जणु डोलतसे
कधी वाटे कार उभी
मोटरगाडी धावतसे
कम्प्युटर की-बोर्ड
कोण बरे चालवितसे?
कधी लाटा समुद्राच्या
भासती उसळती गगनी
सुर्यास गिळणारे जलज
जणु भासे पुत्र अंजनी
अंबरातली भरलेली
मेघांची सभा झाली समाप्त
वाऱ्याच्या वेगाने आनंदे
धावले सारे ढगांचे आप्त