जुनं ते सोनं
जुनं ते सोनं


ओंजळीत घेऊन
जुन्याच चालीरीती
परंपरा संस्कार
पेरतो रितीभाती
रुजतील मनात
फुटलीत नाविन्य
पालवी चमकेल
सरेल पाप दैन्य
जुन्या म्हणी उगाळा
पेच नवे सोडवा
मुलांच्या मनातल्या
संस्कारांना घडवा
जुनी लोकं जपूया
अनुभवांचे मोल
शिदोरी उघडून
नव्या पिढीला तोल
न व्यर्थ काही जगी
जुनं ते सोनं जाण
जपावी मूल्ये सदा
लाभो जगास भान