पान्हा..!
पान्हा..!
अंधारली होती रात्र
कुठूनसा टाहो येई
कोण कुठली होती ती
पान्हा तान्ह्या जीवा देई
दुपट्यात गुंडाळली
राती गंधाळली जुई
येता पदराखाली ती
मन नाचे थुई थुई
कळ उठते उरात
पानी उतरते शाई
हाती घेऊन लेखणी
गाते मनीची अंगाई
डाग वांझोटेपणाचा
तिच्या माथी उगी बाई
जीव भुकेला दिसता
जागली तिच्यात आई