STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Romance Tragedy

3  

SANGRAM SALGAR

Romance Tragedy

फक्त तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी

1 min
184

असेल जरी मनात तिरस्कार तिच्या

रचले महाल शब्दांचे तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

रस्ता ओळखीचाच होता

पण, पायताणं झिजवली तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

झाल्या कित्येक वेदनेच्या जखमा जरी

आठवणींचा मलम लावत होतो तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

रात्ररात्र जागलो तिच्या एका संदेशासाठी

सोसला थंड गारवा तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

एका नजरेवरून तिच्या

त्यागल्या कित्येक गोष्टी तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

शोधल्या वाटा अंधारातही

काही अनमोल क्षणांचा प्रकाश घेवून तिच्यासाठी

फक्त तिच्यासाठी.......

सांगण्यावरून तिच्या

विसरलो तिलाच तिच्यासाठी

सर्वकाही फक्त तिच्याचसाठी......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance