कातरवेळ..!
कातरवेळ..!
कातरवेळ
अशी गच्च भरून गेलेली
ओंजळ रिती
मुक्त ओसंडून वाहिलेली
वीण नात्याची
अशाच वेळी ती सुटलेली
वाहून ओझं
कदाचित ती ही थकलेली
कळी प्रीतीची
फुलून अवेळी खुडलेली
जन्मांतरीची
साथ अर्ध्यावर सोडलेली
खूण प्रेमाची
उदरात तिच्या वसलेली
पुन्हा नव्याने
रूप त्याचं घेऊन आलेली
