STORYMIRROR

Anu Dessai

Fantasy Others

3  

Anu Dessai

Fantasy Others

पाळणा..!

पाळणा..!

1 min
267

बाई बांधला पाळणा 

बाळ पाळण्यात झुले

आई जोजावते बाळा

हसू तिच्या गाली फुले


होता स्पर्श माऊलीचा

बाळ खुदकन हसे

दवबिंदू ओघळता

पुष्प हेलकावे तसे


झोपी जाईल छकुली

माय झुलवाया लागे

तन थकलं कितीही

नयन राहती जागे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy