एक उसासा पुन्हा घेतला...
एक उसासा पुन्हा घेतला...
चार पावलं पुन्हा मागं गेलो...
म्हटलं मारावा जरासा फेर-फटका...
पण परत येताना मात्र...
तो वेळ पायात घुटमळत होता...
हुर-हुरत्या मनाने माझ्या...
परत त्याची विचारपुस केली...
"का रे बाबा लळा लावतोस???
सलगीची आता संधी गेली..."
विनवणी कडे माझ्या...
केला काणा डोळा त्याने...
म्हणाला "थांब रे जरा, बसू थोडं...
आणि बोलुया जरा नव्या जोमाने"
बोलण्याचा रोख त्याचा...
आला लक्ष्यात माझ्या...
जुनं एखादं पालुपद निवडून...
बेत आहे बहुदा चर्चेचा...
तश्या बऱ्याच गोष्टी राहिल्या होत्या...
पण हा नक्की काय उखरतोय???
जुन्या चकव्यात पुन्हा फसवतोय...
की नवीन कोडे घालतोय...
त्या किंचित काळासाठी...
मनाची घालमेल झाली...
आवंढा गिळला, कधी न कळला!!!
म्हटलं "नक्कीच पंचाईत आली"
पण त्याने तसे काही केलेच नाही!!!
उलट म्हणाला...
बोल जरा स्वतःशीच...
कर स्वतःचीच विचारपुस...
जे राहिलं ते राहूदे की...
कशाला उगीच त्याची धुसमुस?
डोक्यावरच्या ओझ्याला...
जरा निवांत बसुदे की बाजूला...
आणि आठवणींचा पिसार्याचा...
बांध पटका, सैल माथ्याला...
हलकं होउदे जरा डोक्याला, अंगाला,
आणि हो! श्वासांना सुद्धा...
अरे वाहूदे की त्यांनाही मोकळं...
नको ठेऊस जरा हिशोब त्यांचा...
ओठांवर मग हसू आले...
ते ही कळलं नाही केव्हा!!!
स्वतःशीच पुन्हा भेटवलं मला...
खूप हायसं वाटलं खरं तेव्हा...
मिठीत घेतलं हळूच त्याला... म्हटलं...
बरं झालं तु भेटला...
तुझ्या रूपाने म्हणा... की निमित्ताने म्हणा...
आज एक उसासा पुन्हा घेतला...
