STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

4  

Sarika Jinturkar

Fantasy Others

ब-याच दिवसांनी

ब-याच दिवसांनी

1 min
357

बर्‍याच दिवसांनी आज  

घडला संवाद मनाचा अंतर्मनाशी  

ना राहिली कुठली खंत ना वेदना कशाची  


बर्‍याच दिवसांनी आज

डोळ्यात साठवलेल्या 

अश्रूंना वाट मिळाली  

काही सुटल्या आठवणींना शब्दांची भेट झाली  


बर्‍याच दिवसांनी 

 आज मायेच्या पदराखाली 

बालपणाला वाटले गोंजरावे 

गतकालीन क्षणांनी परत हसून

 कडू-गोड आठवणींना मनामध्ये नव्याने सजवावे


बर्‍याच दिवसांनी आज

वाटले दूर कुठेतरी क्षितिजावर पाऊल ठेवावे विचारांना नवी दिशा देत नव्याने आज पुढे जावे


बऱ्याच दिवसांनी 

वाटले हरवलेल्या मनाला कुठेतरी शोधावे अन् अडखळलेल्या या वाटेला हसत पार करावे 


बऱ्याच दिवसांनी 

वाटले आयुष्य हे भरभरून जगावे मनसोक्त फिरतांना वाटा नेईल तिकडे स्वच्छंदी बागडावे अन् यशाला गवसणी घालत 

स्वतःला कवेत घ्यावे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy