ध्येय
ध्येय
काळाच्या बदलत्या ओघात
प्रयत्न करणे सोडू नये
अपयश जरी आले वाटेला
मनाने कधी खचू नये
ध्येय निश्चित करावे अगोदर
स्वप्न ही तशीच बघावी
यशस्वी होणार आहेच मी
स्वतःला यशाची हमी द्यावी
ध्येय स्पष्ट असावे आपले
पाऊलवाट तशीच असावी
अपयशावर मात करून
यशाची उंची गाठावी
प्रयत्नशील राहावे सदैव
कुठली अपेक्षा न ठेवता
होणार सार मनासारखं
विश्वास स्वतःवर असता
जीवन आहे एक परिक्षा
वाट अवघड खडतर
कास धरूनिया प्रयत्नांची
गाठावे यशाचे शिखर...
