मनाची आठवण
मनाची आठवण
वेळ म्हणुनी गेलास, माहीत नाही कोणाला
काळ होऊनी सरलास, आठवण आहे या मनाला
जगलो तुझ्या भोवती, गरज काय ती तणाला
कधी कधी कौतुक, होत असते सणाला
बाकी आयुष्य वाटे, संपतय सारं कोण्याला
काळ होऊनी सरलास, आठवण आहे या मनाला
कधी कधी वाटे, बुद्धिच लागलीय पणाला
काळजी साऱ्या होती, धन्यवाद माझ्या गणाला
झाले कैक कष्ट, काम करताना माझ्या तणाला
काळ होऊनी सरलास, आठवण आहे या मनाला
व्याकरणाच्या चुका माझ्या, लागे तुमच्या गळाला
जगणं सारं नशिबाशी, विचारा त्या माश्याला
सुंदर डोळे कोणाचे, आठवते ती प्रशाला
काळ होऊनी सरलास, आठवण आहे या मनाला
आशीर्वाद ओटी भरा, कवीच्या खाणाला
वाव द्या साऱ्यांच्या, साऱ्याच त्या गुणाला
वैर कश्याला हवे, कोणासोबत कश्याला
काळ होऊनी सरलास, आठवण आहे या मनाला
