कसे जगावे...
कसे जगावे...
नेहमीच नव्याने तुला आठवावे
डोळ्यातले पाणी कित्येकदा पुसावे
भूतकाळात मी तुझ्या-माझ्या रमावे
भान होता वास्तवाचे मी पुन्हा भानावर यावे
अन् तुझ्या आठवणीत गुंतवावे
नजरेसमोर नसलास तरी
काळजाच्या गाभाऱ्यात तुला पुजावे
कधी हसावे, कधी रुसावे
देहभान हरवून माझे
तुला मी आठवणींमध्ये ही जपावे
सांग ना आता तुझ्याशिवाय मी रे
कसे जगावे...
