आली दिवाळी...
आली दिवाळी...
नक्षत्रांचे देणे धरतीला लाभले
जणू चांदणे भूवरी पसरले
घेऊनी सुख-सौख्याचा वर्षाव
चांदण्या सवे भेटीस आले
आकाश धतीला आली दिवाळी
घेऊनीया लखलखीत साज
सजले प्रत्येक हो दार आज
आकाशकंदील शोभे मधोमध
जणू चंद्राचेच गोजिरे रूप
किती हो सुख आली दिवाळी
पशुधन जपुनी दाखवावी
कृतज्ञता आपल्या परंपरेची
सवत्स धेनु पुजुनी राखावी
अभाधीत ही कामधेनू
आली दिवाळी
सण वर्षाचा हर्ष-आनंदाचा
नाही कुठेच सुखाला तोटा
आरोग्य हाच खरा साठा
धन्वंतरी चा संदेश वाचा
शरीरास संभाळा आली दिवाळी
गृहलक्ष्मीचा हात जिथे फिरे
तिथे साक्षात लक्ष्मी वसे
पुजुनी सोनपावली लक्ष्मीस
करू मुलीस सबला-साक्षर
हेच व्रत-कैवल्य आली दिवाळी
जसा पती आहे परमेश्वर
औक्षण करूनी पाडव्याला
मागू अखंड कुंकवाच लेन
त्याच्यासवेच हवे हर सुख
प्रेमाची आरास आली दिवाळी
भाऊ माझा पाठीराखा
जिवाभावाचा माझा सखा
उदंड आयुष्य लाभो त्याला
हीच ओवळणी मागते आज
माहेरचे सुख आली दिवाळी
येऊनी सगळेजण एकत्र
करू विनवणी देवास
सुखी ठेव माझ्या घरदारास
दिव्यांची हो ही आरास
किती सुरेख आली दिवाळी