STORYMIRROR

Sarika Gundawar

Tragedy Others

3  

Sarika Gundawar

Tragedy Others

कठडा

कठडा

1 min
179

गावाच्या वेशीवरचा टिमटिमणारा दिवा, 

म्हणतोय मला उद्याच्या इतिहासात तू साक्षीदार हवा. 

पोटाची खळगी जरी आज भरली नाही, 

तरी उद्याच्या यशाची आस सोडली नाही. 

जर मजुराच्या घरी मजुरच घडणार असतील, 

तर कशाला हिणवता, त्यात तुमचे स्वार्थही असतील. 

कधी आमच्या मोकळ्या श्वासांना, तुमच्या कर्तव्यामधे आणून तर पहा, 

तुम्ही गाडलेली आमची स्वप्न, माणूस म्हणून एकदा कोरून तर पहा. 

आम्हाल तुम्ही ज्ञानशून्य ठरवून, विजयाचे झंडे रोवले खरे, 

पण आपल्याच माणसांना मागे सारून पुढे जाणे नव्हे बरे. 

आम्ही मागे पडलो तरी, माघार कधी घेणार नाही, 

प्रयत्न करू जिंकून दाखवू, पण न लढता हरणार नाही. 

तुम्ही बांधलेला कठडा, प्रतीक आहे असमानतेचे, 

आम्ही उभारू स्वप्न नव्या आशांचे, नव्या प्रयत्नांचे. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy