शाळेतील गमतीजमती
शाळेतील गमतीजमती
गावाच्या चौकात आहे माझी शाळा
तिजसाठी अजूनही पाझरतो जिव्हाळा
रागाची नि लोभाची माणसं तिथं गावली
जणु जन्मभराची शिदोरीच दावली
माय बाप माहया शाळेचे कौतुक गाऊ लागले
बाई तू डॉक्टर होते का इंजिनिअर मले विचारू लागले
मले डॉक्टर बि कळेना ना इंजिनिअर बि कळेना
तरी होते होते म्हणू लागली,
मोडकीतोडकी इंग्रजी बोलून
वर्गात मिरवू लागली
गणिताच्या तासाले छातीत धडधडच वाटे
ऊत्तर देता देता जणू जीव माझा आटे
विज्ञान विषय होता मोठ्या आवडीचा
त्याचा अभ्यास करून वाटे, माणूस नाही दिड-दमडिचा
मास्तरची छडी मले प्रसादच वाटे
पण चार पाच खाल्ले की येई अंगावर काटे
सरले ते दिवस, सरल्या त्या आठवणी
घट्ट खुणा रोवल्या आहेत, आजही माझ्या मनी
