STORYMIRROR

Sarika Gundawar

Tragedy

4  

Sarika Gundawar

Tragedy

मागे वळून पाहताना

मागे वळून पाहताना

1 min
265

मागे वळून पाहताना नजर जरा बिथरत होती

माझ्याच पायाखालची माती अश्रूंसवे घसरत होती


कधी न सुटणारे कोडे तर कधी न मिळणारे डाग होते

हळूहळू जखमा कोरणारे हे माझ्याच आयुष्याचे भाग होते


आयुष्याच्या वळणावरचे हास्य फार महाग होते

हे माझ्याच साक्षीने बनलेले न कळणारे सुराग होते


कधी थांबलेल्या पामराला ऐकू येणारे सातही राग होते

तर कधी तुटलेल्या तारांचे विखुरलेले छोटे भाग होते


जाणिवांच्या पलिकडचे क्षितिज तसे अमाप होते

पण तरीही जगणे इथे स्वस्त आणि मरण चक्क माफ होते


एकाच चव्हाट्यावर येऊन मन फार काही सांगून जाते

थोड्या वेळासाठी सारं काही क्षुल्लक ठरवून जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy