STORYMIRROR

Sarika Gundawar

Inspirational

3  

Sarika Gundawar

Inspirational

ओंजळ

ओंजळ

1 min
215

ओंजळ सारे भरूया आपण मातृभूमीच्या प्रेमाने

नका बाळगू द्वेष कुणाचा, होऊ अनमोल ज्ञानाने


कधी पाहिले का पैशाने भूक भागता उदराची, 

नाती जोडून एक बनूया, गाठू ऊंची जगण्याची


जातिवादाला नको थारा, रक्षण करूया या मातीचे

सारे आपण भारतीय, साधू ऐक्य या देशाचे


लहान मोठा हा भाव आता जाऊ दे मिसळून मातीत

मातृभूमीचा जयघोष गरजू दे इथल्या प्रत्येक छातीत


देशसेवा करण्यासाठी घेऊ प्रतिज्ञा उघड्यावरती

तनामनाने या देशाचा मी अन् अभिमान इथल्या ख्यातीवरती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational