बंध रेशमी
बंध रेशमी
नाते बहिण भावाचे
अलवार फुलणारे
सुगंधाने मंत्रमुग्ध
आनंदाने डोलणारे
सहोदर बंधुराया
रक्त नात्याचे बंधन
सहजच जोडतात
कर जोडून वंदन
नातं बहिण भावाचे
कुटुंबात बहरते
गीत प्रेमाचे गोडवे
ओठी सहज स्फुरते
आई बणून देतसे
सदा बंधूला आधार
नको क्लेषाचे भांडण
देते मायेचा पदर
बंध रेशमी धाग्याचे
नाही असे तुटणार
मऊशार धाग्यापरी
विश्वासाने फुलणार
सायंकाळी आयुष्याच्या
छत्र चामर यशस्वी
वंदू चरण बंधूचे
प्रेम करती मनस्वी
