पक्षिणी. (१३/११/१९७५)
पक्षिणी. (१३/११/१९७५)


कसे उमजले तुला पक्षिनी? अरुणोदय झाला पक्षीनी .......
तेवत होती अथांग गगनी चंद्रज्योत. . .साजिरी.
शांत झोपले जग हे सारे,तू जगी कोतरी.
मिटल्या नयनी स्वप्नी तुझिया सूर्य.....कसा आला (१).
प्राचीवर्ती येता बहरून रंगांचे.....उपवन.
मधुर स्वरांची सुधा शिंपिसी इवल्या चोचीतून
स्वीकारायला येतो रवी ती मंजुळ स्वरमाला (२).
फुलपाखरे उडू लागली कमलातून भुंगे.
सोन कवडसे दुडू दुडू येती होतील ..जन जागे.
असशील गेली दूर तेधवा दाने....टिपण्या ला. (३).
तू कवियित्री,तुझे ऐकता नाद मधुरसे गीत.
समीर करतो शब्द माझिया कानी ध्वनी मुद्रित.
पुलकित करिती ती त व गीते माझिया मनाला (४).