आशेचे पंख
आशेचे पंख
मिणमिणती पणती बोलते
इवल्याशा प्रकाशाने उजळे दिशा
आत्मविश्वासाचा एकच किरण
अंधारावर मात ही एकमेव आशा।।
येता जीवनी ढग नैराश्याचे
निर्भिड मनाने सामोरे जाणे
आशेची मशाल घेऊन हाती
यशोशिखरावर स्वार होणे।।
झगमगत्या दुनियेतही पेरू
नीति अन् संस्कारांचे मोती
खात्री मज, निर्माण होतील
सूर्यासम तेजस्वी ज्योती।।
वादळ वाऱ्यातून वाट काढत
अश्वारूढ होऊनी स्वार हो
नव स्वप्नांची होईल पहाट
आशेचे पंख लेवुनी विजयी हो।।
नवी उमेद, नवी आशा
जीवनात येणारा एकेक क्षण
जिद्द, चिकाटी, अनुभवाने शिकणे
हिच त्रिसूत्री यशाचे खरे लक्षण।।