मी एक घायाळ सैनिक
मी एक घायाळ सैनिक
मी एक घायाळ सैनिक
क्षीण होत आहे शक्ती
मृत्यूला कवेत घेतांना
कळणार तरूणांना देशभक्ती ।।
मी उभा असतो तासन् तास
रक्त गोठावणाऱ्या हिमवृष्टीत
झेलत आहे शत्रूंचे वार
या धगधगणाऱ्या भूमीत ।।
दुश्मनांच्या हल्ल्याला नच भ्यालो
प्रतिहल्ला करूनी तटस्थ राहिलो
शत्रूंना धाडले क्षणात यमसदनी
मातृभूमीच्या कुशीत विसावलो ।।
माझ्या तान्ह्या लेकराचे
मुख अद्याप नाही पाहिले
किती दूर्देवी बापास माफ कर
सारे जीवन देशसेवेस वाहिले ।।