कळत नाहीये मला...
कळत नाहीये मला...


कळत नाहीये मला सख्या तुझ्यावर कसं प्रेम करावं
तोडून सारे बंधन तुझ्या मिठीत सामावून जावं
की,कोसळणाऱ्या जलप्रपातासारखं ओसंडून वहावं..।
उधाणलेल्या सागरासम जीव उधळून प्रेम करावं
की,मेघ धरेच्या मिलनासम प्रीतीत चिंब चिंब भिजावं
कळत नाही रे मला सख्या तुझ्यावर कसं प्रेम करावं..।
हाती घेऊन हात तासनतास नजरेतूनच बोलावं
की,प्रेमाची साद ऐकताक्षणी माझं सारं भान हरपावं
कळतं नाही रे मला सख्या तुझ्यावर कसं प्रेम करावं..।
अबोल तुझ्या भावनांना ओठांवर येऊन मुक्त करावं
की,जुने सारे गवसले म्हणून ह्रदयातील स्पदंनांना साद घालावं
कळतं नाही रे मला सख्या तुझ्यावर कसं प्रेम करावं..।
राधेने केलेल्या निस्वार्थ प्रीतीत कृष्णसख्यासम
रासलीलेत रमावं
की,मीरेच्या भक्तीपुर्ण प्रीतीसारखे निरपेक्षपणे समर्पण करावं
कळतं नाही रे मला सख्या तुझ्यावर कसं प्रेम करावं..।