मायमाऊली
मायमाऊली


आई असे जणू समईची एक वात
उजळूनिया घराला देई मोलाची साथ ।।
आई घराचा कळस,आई दाराची तुळस
आई मायेचे मंदिर,जिथे ईश्वराचा वास ।।
आईच्या नात्याला नसावी कशाची बंधने
मनानेच कळावी ह्रदयातील नाजुक स्पंदने ।।
प्रत्येक आईच्या उदरात उब असे मायेची
जशी उन्हाला हवी असते सोबत छायेची ।।
तोडून मोहपाश सारे एकरूप व्हावे
मायेच्या कुशीत शांत निद्रा सुख घ्यावे ।।
आई लावे मुलांना गोडी मुल्यसंस्कारांची
वीरांना जन्मदेई तू मुर्ती महान त्यागाची
वात्सल्य मुर्ती आई कळली असे कुणाला..
धन्य भाग्य ते माझे,तिच्या पोटी जन्म झाला ।।
दैवस्वरूप माय पाहूनी ब्रम्हांड आठवावे
कर जोडूनी मनाने नित्य तुलाच स्मरावे ।।