माहेरचा पारिजात
माहेरचा पारिजात

1 min

128
माहेरचा पारिजात
झाले मन सुगंधित
सये आठवण येते
वारा सांगतो गुपित ।।
नित्य सडा दारापुढे
माहेरची आठवण
लगबग वेचण्याची
ओंजळीत बालपण ।।
पारिजात सडा दारी
मोती पोवळ्यांची रास
माळ गुंफुनीया वाहू
श्रद्धाभावे माधवास ।।
जरी इवलेसे फूल
नाही आसक्तीचे बंध
असे क्षणिक आयुष्य
देई इतरांस गंध ।।
सासरच्या अंगणात
पारिजात लावियला
खत घालून मायेचे
स्नेहभावे मोहरला ।।