अबोल प्रीत
अबोल प्रीत
दिनरात तुझा चेहरा
स्वप्नात नित्य येतो
अबोल या प्रीतीला
सप्तसुरांनी छेडतो ।।
प्रेमाची आर्त साद
तू,एकदा तरी ऐकना
आता पुरे हा अबोला
शब्द ओठातील भावना ।।
नकोच मुळी अबोला
घुसमटणारे ते द्विधा मन
ओसंडून वाहू दे प्रीतझरे
व्हावे दोन जीवांचे मिलन
आतुरले तव भेटीस
मनमोर फुले हृदयांगणी
वचन दे, मज चंद्र साक्षी
तूच माझी जीवनसंगिनी ।।