परिचय*
नाव: सौ.कल्पना दत्तात्रय देशमुख
पत्ता-नवी मुंबई (घणसोली)
शिक्षण: B.A in मराठी
आवड: वाचन, गायन, विविध विषयांवर लेखन,मी कविता, हायकू रचना,चारोळी,अभंग रचना, गीत,विडंबन गीत,तसेच विविध विषयांवर लेख लिहिले आहे.पाककृती करणे
ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे, T.V जास्त प्रमाणात न ... Read more
परिचय*
नाव: सौ.कल्पना दत्तात्रय देशमुख
पत्ता-नवी मुंबई (घणसोली)
शिक्षण: B.A in मराठी
आवड: वाचन, गायन, विविध विषयांवर लेखन,मी कविता, हायकू रचना,चारोळी,अभंग रचना, गीत,विडंबन गीत,तसेच विविध विषयांवर लेख लिहिले आहे.पाककृती करणे
ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे, T.V जास्त प्रमाणात न पहाता लहान मुलांमध्ये रमणे, बालगीत व गाणेही लिहिते..श्री स्वामी समर्थ व गुरूमाऊली यांच्यावर १५ गाणी लिहिली आहेत.. प्रतिष्ठित गायकांकडून गायन करून CD किंवा music album करण्याचा मानस आहे.. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
मी कवयित्री व लेखिका आहे.
नवी मुंबई साहित्य परिषद ेची कमिटी मेंबर आहे.
तसेच *आम्ही लेखिका* या नवी मुंबई शाखेची कार्याध्यक्ष आहे.काव्यप्रेमी मंच नवी मुंबई उपाध्यक्ष
माझा "काव्यकल्प" नावाचा काव्यसंग्रह सप्टेंबर 2017 मध्ये
दूसरा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
नवी मुंबई साहित्य परिषद या संस्थेद्वारे प्रकाशित झाला.
यामध्ये अनेक साहित्यिक उपक्रम आम्ही करत असतो.
दै.सकाळच्या *तनिष्का स्री प्रतिष्ठा अभियान* यामध्ये दोन वर्षे मी होते.त्यामध्ये प्रत्येक सामाजिक उपक्रमांवर मी लिहिले आहे.
*जलदिंडी* *या पाणी वाचवा* कार्यक्रमावर कविता व भारूड लिहून ते नवी मुंबईचे महापोर *श्री सागर नाईक* असताना त्यांच्यासमोर सादर केले व मला साम टी व्ही ने दखल घेऊन मुलाखती साठी बोलावले.
डेंग्यू मलेरिया या *समाज जागृती*साठी मुंबई महानगर पालिके अंतर्गत स्पर्धेत *प्रथम* क्रमांक मिळाला होता..
अनेक वृत्तपत्रे व *दिवाळी अंकांमध्ये कविता आणि लेख प्रकाशित झाले* सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता, इ. वृत्तपत्रे आणि दीपोत्सव, चैत्र पालवी, ताऱ्यांचे जग, स्नेहसखी,आता नकोत अश्रू बंध भावनांचे,आरंभ इ. दिवाळी अंकांमध्ये कविता लिहून प्रकाशित झाले आहे.
तसेच सन,२०१३ मध्ये नवी मुंबईत मंगळागौरी स्पर्धेत भाग घेऊन आमच्या ग्रुपला द्वितीय क्रमांक मिळाला होता.त्यात मी एक उखाणा स्वतः लिहिला होता व सादरही केला.
*अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांवर कविता लिहून त्यांना प्रत्यक्ष भेट दिली* आहे जसे श्री स्वामी समर्थ परिवाराचे पीठाधीश *प.पू. गुरुमाऊली*, ज्येष्ठ समाजसेविका *सिंधुताई सपकाळ, कोल्हापूर जिल्ह्याचे उपमहानिरीक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील, अभिनेत्री अलका ताई कुबल, शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे*, चला हवा येऊ द्या फेम *सागर कारंडे व भाऊ कदम, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, हेम्लेट या लोकप्रिय नाटकाचे प्रमुख कलाकार सुमीतजी राघवन तसेच मनवा नाईक,प्रदीपजी वेलनकर* इ. अनेक...
प्राप्त झालेले पुरस्कार:
१. नवी मुंबई साहित्य परिषद मध्ये पत्रलेखनासाठी प्रथम पुरस्कार प्राप्त
२. प पाळीचा या कवितेसाठी समाजबंध राज्यस्तरीय *द्वितीय पुरस्कार प्राप्त तसेच *मुलगी वयात येतांना* या संवेदनशील विषयावर पत्रलेखनासाठी मुंबई-कोकण विभागातून *उत्तेजनार्थ* मिळाले
३. नवे वर्ष नवा संकल्प या कवितेसाठी मनस्पर्शी साहित्यमंचातर्फे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त
४. *जीवनाच्या वाटा* या कवितेसाठी शब्दवेली साहित्यमंचातर्फे तृतीय पुरस्कार प्राप्त
५) धनलक्ष्मी या महिला मंडळाने माझा लेखन प्रवास व सामाजिक उपक्रम याची दखल घेऊन अत्यंत मानाचा *धनलक्ष्मी सखी सन्मान* पुरस्कार दि.३० मार्चला मिळाला.
६)२५ आँगस्ट २०१९ रोजी फुलोरा कलेचे माहेर घर यांच्यातर्फे *फुलोरा रत्न* हा साहित्यातील मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.
७)*पाऊलखुणा साहित्य समूह, काव्यसखी मंच,महाराष्ट्र सखी मंच,काव्यप्रेमी शिक्षक मंच तसेच
मनस्पर्शी साहित्य मंच इ.समूहात तसेच फेसबुक समूह इ. विविध स्पर्धेत भाग घेऊन काव्य लेखन ,चारोळी,लेख,व,हायकू रचना लिहून उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, प्रथम,द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे 70च्या वर प्रमाणपत्र प्राप्त, तसेच विविध संमेलनात सहभाग घेऊन कविता सादर केल्या आहेत..
आत्ता पर्यंत मान्यवर, नातेवाईक व माझ्या प्रिय मैत्रिणी यांना 50 च्या वर शुभेच्छा चारोळी/कविता लिहिल्या आहेत..व भेट दिली आहे.
सामाजिक जाणीव व अध्यात्माची आवड असल्याने मी अनेक संस्थांशी जोडले गेले आहे.यामध्ये आम्ही महिलांसाठी कार्य करतो व आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ (दिंडोरी प्रणित)या मार्गातर्फे विनामूल्य बालसंस्कार केंद्र चालवतो.
तसेच *बालसंस्कार व पालकत्व एक कला तसेच युवाप्रबोधन* याविषयी व्याख्यान/मार्गदर्शन करतो
या मार्गातून आत्तापर्यंत संपूर्ण भारतात ६,५०० बालसंस्कार केंद्र निर्माण झाली आहेत
अमेरिका २० ठिकाणी, मलेशिया ५ते ६, दुबई ७ ते ८ तर नेपाळ २० ठिकाणी कार्यरत आहेत.
येत्या काळात इंग्लंड, नेदरलँड, व इतर देशात हे सेवाकार्य करायचे मार्गाचे नियोजन आहे.
सौ. कल्पना देशमुख
कवयित्री व लेखिका
नवी मुंबई Read less