एका पावसाची गोष्ट
एका पावसाची गोष्ट


भेट तुझी नी माझी
एका सांजवेळी झाली
पाऊसधारा बरसल्या
तू जवळी माझ्या आली ।।
हाती हात घेतांना
लाजून चूर झाली
अंग अंग शहारले
गालावर लाली आली ।।
थरथरणारी काया ही
नजरेत प्रीत दाटली
अधीर मन होतांना
थोडी भिती ही वाटली ।।
नभ दाटून येतांना
सारे भान हरपले
कळी खुलली मनात
हर्षाचे क्षण गवसले ।।
दोन जीवांचे मिलन
प्रीत रंगात न्हाले
पावसाच्या या कथेत
अखेर, तव संसारात रमले ।।