मन गुलाब गुलाब
मन गुलाब गुलाब


मन गुलाब गुलाब
झाले तनमन धुंद
दरवळ चहुदिशा
गेला स्पर्शूनिया गंध ।
रोमरोमी मोहरले
कळी गुलाबी खुलली
गजऱ्यात माळतांना
सखी लाजून हसली ।
दिन आठवतो मज
प्रीत गुलाब सुकला
पुस्तकाच्या त्या पानात
आहे तसा गवसला ।
हेचि प्रेमाचे प्रतिक
देई संदेश जगास
तव मिलनाची सख्या
आहे अजुनही आस ।