कृष्णा!पुनश्च जन्म लेवून ये..
कृष्णा!पुनश्च जन्म लेवून ये..


कंसाच्या अंधकारमय कारागृहात
जन्म देवकीच्या उदरात जाहला
भगवतगीतेतून उपदेश देऊनी
तनमनात ज्ञानप्रकाश चेतविला ।।
आरंभ तूच अन् अंतही तू
केशवा तव लीला अपरंपार
मंत्रातील ओंकार अन् चंद्र सूर्य तू
तूच परमसत्य निर्गुण निराकार ।।
अर्जुनाचा सारथी होऊनी तू
विश्वरूप दर्शन तया दाविले
उठ!युद्धास सज्ज हो पार्था
विजय सत्याचा हेचि मुखी वदले ।।
कलियुगातील परिस्थिती बिकट
हे कृष्णा! पुनश्च जन्म लेवूनी यावे
सुदर्शन चक्र फिरवून विश्वाला
घनघोर युद्धापासून जनतेस तारावे ।।