सहवास
सहवास
तुझा सहवास वेड लावुन गेला
आज पुन्हा आठवांचा हिंदोळा
तुझं हसण रुसणं जीव व्याकुळ जाहला
आज पुन्हा खोटाच स्वप्नांचा मेळा
असाच एक क्षण आनंद देतो
तोच क्षण विरहाचे दु:ख साहते
प्रितीचा प्याला अमृत रस पितो
विरहाचे दुख्ख विष जीवनी भिनते
हुंदका दाटतो विरहात उरात
आठवांचे मनात उठते रान
किती वादळे शमती मनात
आसवांचे दाटुन येती घन
वाट अजुनही पाहते तुझी रे
कालचेच स्वप्न गीत आहे तुझे
कातरले स्वर हे दाटुन आले
असे काय चुकले प्रिया माझे

