जाणीव
जाणीव


तु माझ्यासाठी जाणीव
जगण्याचा श्वास
अबोल तरी ध्यास
तु सार्थ विश्वास
तुझ्यातच मी रमतो
वेगळे जग नकोच मला
तुला पाहुनच मी हसतो
टचकन् पाणी येतं डोळा
तुला जेव्हां ञास होतो
साधं प्रेम राणी माझं
तरी ह्दयांतुन करतो
रुसवा तुझा गोड मला
राग तुझा मी झेलतो