STORYMIRROR

Vikas Chavan

Romance

3  

Vikas Chavan

Romance

एक कविता..

एक कविता..

1 min
28.5K


असेन मी, असशील तू, असेल आपलं छोटं घर,

तुझ्या ओढीनं परत येईन काम करुन दिवसभर.

आठवडाभर काम करुन, देईन मी तुला सुख,

सुट्टी फक्त तुझ्यासाठी, नसेल मागे रुखरुख.

असेल ते खायचं आपण, अंगणात बसून दोघांनी,

पहिल्या घासाचा मान तुझा, भरवेन माझ्या हातांनी,

नसेल सोबती कोणी तरी, असतील चंद्र न् चांदण्या,

मांडीवर माझ्या निजताना, नकोस ओलाऊ पापण्या.

एवढीच माझ्या स्वप्नांची कुवत त्यात काही नाही नवं

पण सुखाची झोप यायला मनाला आणि काय हवं?

मनाचे हे सारे भास, खेळतात मनात माझ्या,

रोजरोज वाटुन जाते, सांगावे कानात तुझ्या.

सांगायचे कसे तुला, कशी करायची सुरुवात?

ओठावर आलेले शब्द, परततात पुन्हा आत.

दु:ख माझं किती वेगळं, तुला कधी न कळण्याचं,

प्रेम तुझ्यावर करुनही तुला , सांगता न येण्याचं..




Rate this content
Log in

More marathi poem from Vikas Chavan

Similar marathi poem from Romance