आठवण तुझी आल्यावर ...
आठवण तुझी आल्यावर ...
आठवण तुझी आल्यावर ...
भेटीस मी होतो आतुर ..
गुंततो मी तुझ्यात
मन माझे फितूर ...
आजही शोधतो मी
तुझ्या पावलाचे ठसे ...
सांगा सखे ग तुजविण
मज अस्तित्व कसे ...
का कुणास ठाऊक ?
मनही होते सैरभैर ...
आस तुझीच लागते
प्रेम आपुले जगजाहीर
तू असतेस कधीही
तुझ्याच नादात ...
मी मात्र तुझ्यापायी
कायम असतो वादात ..

