STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance

3  

Shivam Madrewar

Romance

जरासे बोल तू...

जरासे बोल तू...

2 mins
234

उमलत्या कळीप्रमाने अबोल का आहेस तू,

लाजाळू च्या वृक्षाप्रमाने का लाजत आहेस तू,

एका स्वतंत्र्य फुलपाखरासारखा आनंद घेत तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल तू...


श्र्वेत चंद्राप्रमाने सदैव चमकत आहेस तू,

चांदण्यांच्या गावामध्ये राहत आहेस तू,

सुर्यांप्रमाने खुप क्रोध धारण करतेस तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल गं तू...



जंगलाच्या गाभाऱ्यात कोकीळे प्रमाने गातेस तू,

पाऊस बरसताच मोराप्रमाणे नृत्य करते तू,

निर्सगाच्या हिरवळीसोबत आनंद पसरविते तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल गं तू...



ठंड वाऱ्यांच्या झुळूकांसोबत वाहतेस तू,

हस्तातील आभाळांसोबत बरसतेस तू,

वसंत ऋतूमध्ये झाडांमागे लपून बसते तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल गं तू...



वेलींप्रमाणे सगळीकडे पसरते तू,

पक्ष्यांप्रमाने आकाशात घिरक्या घेते तू,

त्यांच्या सोबत प्रेमाचे बोल गातेस तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल गं तू...



माझ्या मनातील दुःखाला तेथेच मिटवते तू,

कधी कधी माझ्या भावनांना रडवते तू,

न बोलावताच आनंदाला बोलावते तू,

ह्या वेड्या मनाला, जरासे बोल गं तू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance